Company Profile

सुप्रजा मसाले

सुप्रजा मसाले हा उद्योग महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहे. सोलापूर जिल्हा हा श्री सिद्धेश्वराची, श्री विठ्ठलाची आणि स्वामी समर्थांची पावन भूमी आहे म्हणून महाराष्ट्र मध्ये नावलौकिकास आहे. परंतु सोलापुरी चादरी बरोबर सोलापुरी शेंगदाणा चटणीने सोलापूरची वेगळी ओळख महाराष्ट्राला करून दिली.

महाराष्ट्राच्या स्वादाचा वारसा सुप्रजा मसाले मानाने पेलावत आहे. अनैसर्गिक साधनांचा वापर न करता भारतीय मसाल्यांचा नैसर्गिक गुणधर्म, स्वाद, सुगंध आणि रंग टिकवून चांगल्या गुणवत्तेच्या आणि उत्तम दर्जाच्या मसाल्याची निर्मिती सुप्रजा मसाले घेत आहे.

उत्कृष्ट दर्जाचे काळ तिखट/काळा मसाला ही सुप्रजा मसाल्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण चवीची ओळख संपूर्ण देशाला करून देण्याच्या प्रयत्नात सुप्रजा मसाले वेगवेगळे मसाले निर्माण करत आहे. त्याची चव अवश्य चाखून पहा.

गौरव चवीचा, स्वाद महाराष्ट्राचा

Get your order

We are glad that you preferred to contact us. Please fill our short form and one of our friendly team members will contact you back.

    X